3rd Annual Function on 17th March 2024
पुणे येथील वर्धापनदिन रविवार १७ मार्च २०२४
नमस्कार,
आपल्या फाउंडेशनचा तिसरा वर्धापनदिन रविवार १७ मार्च २०२४ रोजी कलादालन सभागृह, पुणे येथे साजरा झाला.
अध्यक्ष श्री अनिल महादेव यांनी स्वागत व प्रास्ताविक करून प्रारंभ केला. ह्या वर्षी सौ अर्पिता वैशंपायन यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आयोजिला होता. त्यांच्या साथीला संवादिनीवर श्री यशवंत आणि तबल्यावर श्री कार्तिक यांनी साजेशी साथ दिली. त्यांनी भीमपलास रागातील बंदिशीने सुरवात करून नंतर नाट्यगीत, अभंग, भक्तीगीत, तराना, भैरवी व सांगतेला संपूर्ण वंदेमातरम सादर केले. सूर, ताल व लय यांचा अप्रतिम मिलाफ असलेला हा कार्यक्रम अतिशय रंगतदार झाला व श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तम दाद दिली.
उपाध्यक्ष श्री श्रीकांत गोपाळ यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर सर्वांनी चवदार अल्पोपहाराचा आस्वाद घेतला व सुमारे तीन तास चाललेल्या कार्यक्रमाची सांगता झाली.




